कुछ और कविताएं

कालची जख्म

कालची जख्म वेगळीच होती
असे कसे म्हणू मित्रा
वेदनांची आवर्तने सारी एकाच जातीची
कबूल! आजचा वार निसटता आहे
भळभळून रक्त वाहत नाही कालसारखे
पण, आजच्या ह्या निसटत्या वारानेच
कालची जख्म जर्द झाली त्याचे काय?
-डब्ल्यू कपूर

000
वाटेनेच आपला धर्म बदलला

हे मात्र पहिल्यांदाच अनुभवतो आहे
नाही असे नाही
तसे चिमटे ह्या आधीही काढले होते
खरे सांगतो,
पायांना ते कधी झोंबलेच नाहीत
आज असे कसे होत आहे ?
चक्क चटके बसताहेत निखारयांचे
माझ्या आधीही कित्येक गेलेत ना ह्या वाटेने;
मग मलाच का ही जीवघेणी सजा ?
माझे पायच झालेत अधिक संवेदनशील
की वाटेनेच आपला धर्म बदलला ?
-डब्ल्यू कपूर
000
झाड एक प्रतीक

झाडांचे एक बरे असते
त्यांना मुक्याने विस्तारता येते
नि:शब्द सहन करता येतात
वादळवारयाचे उन्मत्त आघात
मला येथल्या मौसमात विस्तारताही येत नाही आणि
त्यांनी दिलेल्या जखमांचा बोभाटाही करता येत नाही
विध्वंसक वादळाच्या मारयाने झाडे वाकतात
भुईसपाट होतात पण
मुळांनी सोसलेल्या आणि पचविलेल्या यातना
त्यांना याची डोळा पाहता येत नाहीत
मी भुईसपाट झालो म्हणजे मला पाहून ते
कुत्सितपणे हसतात आणि
माझ्या पुढयात उभा असतो उद्ध्वस्त स्वप्नांचा काफिला
मुळे धरतात झाडे आणि प्रयत्नांची शिकस्त करून
उभे राहतात तेव्हा
धरणीला त्यांचा हळूवार विकास पाहून
धन्य झाल्यासारखे वाटते
मी मूळ धरून उभे राहण्याचे धाडस करतो तेव्हा
त्यांना माझ्याबद्दल संशय येतो
मी प्रकृतीचा सूर धरून विस्तारण्यासाठी
त्यांना व्यवस्थापकीय कलमा माझा उच्छेद
करण्यासाठी.....!
-धर्मराज निमसरकर
000
ते निसर्गाविषयी बोलतात

ते निसर्गाविषयी बोलतात
ते पर्यावरणाविषयी बोलतात
बोलतात सुंदर, सुरेख पशुपक्षांविषयी
आणि बोलतात आभाळातल्या चंद्रतारयांविषयी

पण ते बोलंत नाहीत
डोंगर दरयाखोरयातल्या आदिवासींबद्दल
ते काय खातात? नि कसे जगतात याबद्दल
त्यांना नाही इंटरेस्ट
कारण ते आहेत ह्या कॉस्मोपॉलिटीन कल्चर मध्ले
हाय-फाय सोसायटीचे मक्तेदार

लक्झरी लाइफ मधून भरल्यापोटी विरंगुळा म्हणून
वा पिकनिक म्हणून ते करतात निसर्गाला जवळ
ते आपल्या तथाकथित अभिरूचीला जोपासत
रमतात प्रायोगिक नाटक वा आर्ट फिल्म मध्ये
पाहतात आर्ट गैलरीत आदिवासींना चितारलेल
जमलंच तर विद्वतेचा आणून सेमिनार मध्ये
वाचतात इंडियन ट्रायबल्स या विषयवर शोध निबंध
देशाला स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे झाली
स्वातंत्र्य म्हणजे काय? हे आजवर न उलगडलेलं कोडं
मिळालेलं स्वातंत्र्य गेलं कुठे?
अजून आदिवासी पाडयात पोहोचलं कसं नाय?

डोगराला लागलेला वणवा त्यांना दिसतो
पण, रानपाखरांच्या पोटात पेटलेला वणवा
ते अनुभवू शकतात काय?
नाहीच, कारण, ते निसर्गाविषयी बोलतात
-बबन लोंढे
000
सभंग

तुकया वाण्याचे
बुडाले दुकान
विकाया मकान, काढले गा

गोरया कुंभाराचा
पेटेचिना आवा
काडी कोणी लावा, बोंबा मारी

सेना नापिताचा
बोथट वस्तरा
कोणी बा निस्तरा, अर्ज करी

सावता माळयाचा
उजाडला मळा
आणीतसे विळा, मानेवरी

चोखा महाराला
मिळे ना बलुतं
संसारी कोली, लागलेले

आणि बडव्याची
तुंदिलशी तनू
दिसे सांड जणू, पोसलेला

-प्रसेनजीत गायकवाड

0 टिप्पणियाँ:

एक टिप्पणी भेजें

मराठी कविता ज्यांना आवड़तात्

About this blog